मुंबई | मुंबई पोलीस आयुक्त पदी परमबीर सिंग यांची वर्णी लागली आहे. परमबीर सिंग यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक सांभाळले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे काल (२८ फेब्रुवारी) निवृत्त झाले आहेत. यानंतर रिक्त असलेले मुंबई पोलीस आयुक्तपदी आज (२९ फेब्रुवारी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीर सिंग हे १९८८चे बॅच आयपीएस अधिकारी आहेत.
Maharashtra Anti Corruption Bureau Chief Parambir Singh will be the next Mumbai Police Commissioner. He replaces Sanjay Barve who is retiring today pic.twitter.com/bbVGKjtLl4
— ANI (@ANI) February 29, 2020
मुंबई पोलीस आयुक्ती पदासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंग, सुरक्षा महामंडळ महासंचालक डी. कनकरत्नम, अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ यांची नावे चर्चेत होती. मात्र, यात परमबीर सिंग याचे नाव आघाडीवर होते. बर्वेंना काल मुंबई पोलीस दलाने निरोप दिला. जर रजनीस सेठ यांची नियुक्ती करायाचे ठरल्यास मुंबई आयुक्त पदाचा दर्जा कमी करावा लागेल, असे बोलेल जात आहे.
परमबीर सिंह यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. परमबीर सिंह यांनी चंद्रपूर, भंडारा जिल्ह्याचं पोलीस अधीक्षकपद सांभाळले आहे. परमबीर सिंह यांनी यापूर्वी ठाण्याचे पोलीस आयुक्तपद सांभाळलं होतं. त्यांच्या कारकिर्दीत कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणीच्या गुन्ह्यात मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली होती, तो अद्यापही कारागृहात आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.