HW News Marathi
महाराष्ट्र

प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे !

मुंबई | प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकांनी सवय आणि सोय बदलणे गरजेचे आहे. प्लास्टिक बंदी ही लोकचळवळ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल (२८ फेब्रुवारी) विधानपरिषदेत केले. राज्यात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्याबाबतचा प्रश्न सदस्य रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केला होता, त्यावर ठाकरे बोलत होते.

ठाकरे म्हणाले, येत्या १ मे महाराष्ट्र दिन हा आपण ६० वा वर्धापनदिन साजरा करीत आहोत. या दिवसापर्यंत राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामीणभाग सिंगलयूज प्लास्टिक मुक्त बनविण्याचा प्रयत्न आहे. शासनाने प्लास्टिक बंदी केली असली तरी यात लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. प्लास्टिकचे घातक परिणाम लक्षात घेता सिंगलयूज प्लास्टिक मुक्त चळवळीमध्ये लोकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे.

महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकॉल अविघटनशील वस्तुंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना २०१८ नुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई परिक्षेत्रातील ५३ प्लास्टिक उत्पादकांना उत्पादन बंद करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहेत. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत संयुक्तपणे बाजारपेठा, हॉटेल्स, मॉल्स इ. ठिकाणी पाहणी करुन प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाते.

२३ जून २०१८ ते १ फेब्रुवारी २०२० पर्यंत भेटी दिल्या असून ८४ हजार २१० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. आणि ४ कोटी ५४ लाख इतका दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यातील विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अधिसूचनेची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी सूचना देण्यात आल्या असल्याचेही ठाकरेंनी सांगितले. या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण पोटे, भाई जगताप, विद्या चव्हाण, मनिषा कायंदे आदींनी सहभाग घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय भूकंप, अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा

News Desk

अशा ठेवणीतल्या शिव्या देऊ की, पडळकरांना रात्रभर झोप येणार नाही | हसन मुश्रीफ

News Desk

शरद पवार, गौतम अदानी बारामतीत ‘या’ उद्घाटन सोहळ्यासाठी हजर

News Desk