मुंबई | “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सर्वांच्या पाठिंब्याने ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांनाही वाटत कि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत”, असे विधान भाजप आमदार राम कदम यांनी केले आहे. राज्याच्या विधानसभा निवडणूक आता अवघ्या काहीच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस सुरूच आहे.
Ram Kadam, BJP on reports that Shiv Sena is aiming to have own CM: Devendra Fadnavis is appreciated by all and he will be the CM again with everyone's support. Shiv Sena is our ally, leaders of opposition are of the opinion that Devendra Fadnavis should be the CM. pic.twitter.com/EkHNNUvHnI
— ANI (@ANI) June 20, 2019
शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी “मंत्री, मुख्यमंत्री पदाचा मुद्दा आमच्यासाठी गौण आहे”, असे म्हणाले असले तरीही शिवसेनेचा निर्धार याहून निश्चितच निराळा आहे. ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त सामनामध्ये छापून आलेल्या अग्रलेखात “शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल”, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे, मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.