HW News Marathi
देश / विदेश

गुजरातमधील आयपीएस अधिकारी संजीव भट्टला जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली | माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि प्रविनसिंह त्यांच्या सहकाऱ्यास जामनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सन १९९० मध्ये पोलीस कोठडीत एका व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणी आयपीसीच्या कलम ३०२ अन्वये गुजरातमधील जामनेर न्यायालयाने भट्ट आणि प्रविनसिंह या दोघांनी ही शिक्षा सुनावली आहे. संजीव भट्ट हे सन १९९० मध्ये जामनेर येथे पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत होते.

१९९० मध्ये भारत बंद पुकारण्यात आला होता. त्यावेळी गुजरातच्या जामनेर येथे हिंसाचार भडकला होता. या हिंसाचारावेळी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी प्रभुदास माधवजी वैश्वानी यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भट्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मारहाणीमुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप ठेवला गेला होता. तसेच भट्ट यांसह त्यांच्या सहकाऱ्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता.

गुजरात सरकारने हा खटना चालविण्यात परवानगी दिली नव्हती. सन २०११ मध्ये सरकारने भट्ट यांच्याविरुद्ध खटला चालविण्यात परवानगी दिली. याप्रकरणी दाखल याचिकेवर पुनर्विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने १२ जून रोजीच्या सुनावणीवेळी स्पष्ट नकार दिला. दरम्यान, सन २०११ साली भट्ट यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. तर २०१५ मध्ये त्यांना बडतर्फ केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान ‘या’साठी घेणार उद्धव ठाकरेंची भेट

Aprna

भाजपने सरकार पाडण्यासाठी रचलेल्या कारस्थानात पायलट अडकले – रणदीप सुरजेवाला

News Desk

भाजपला जेव्हा कोणी विचारतही नव्हतं तेव्हा आमच्या कुटुंबाने ….! । प्रीतम मुंडे

News Desk