HW News Marathi
राजकारण

तिसर्‍या दिवशीही विरोधी सदस्यांचे विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन

मुंबई | राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही (१९ जून) राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मंगळवारी (१८ जून) राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. परंतु, अर्थसंकल्प सादर होतानाच तो अर्थ मंत्र्यांच्या सोशल मिडियावर प्रसिद्ध होत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी समोर आणला. त्यामुळे या मुद्दयावर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

विरोधकांकडून बुधवारी (१९ जून) सकाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरुन अर्थसंकल्प फुटल्याचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला. याशिवाय राज्यातील दुष्काळ आणि सरकार करत असलेले दुर्लक्ष तसेच शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासह इतर मुद्दयावरही राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरुन आंदोलन केले. या घोषणाबाजी आणि आंदोलनादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे येताच ‘नाथाभाऊंना डावलणा-या सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी पुढे होत अजित पवार यांना हस्तांदोलन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीच्या निमित्ताने साठ्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

Gauri Tilekar

“मी पुन्हा येईन… या विधानाची टिंगल टवाळी झाली,” फडणवीसांनी सभागृहात टीकास्त्र सोडले

Aprna

राज्यातील विकासकामे गुजरात, कर्नाटकची आहेत का? अजित पवारांचा ‘ईडी’ सरकारला संतप्त सवाल…

Aprna