HW News Marathi
महाराष्ट्र

वेल्हा तालुक्याला ‘राजगड’ नाव द्या

बारामती | राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती संघातील खासदार सुप्रिया सुळे यांनी आणखी एक नवी मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे. वेल्हा तालुक्याला राजगड नाव देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या राजगडाला स्वराज्याची पहिली राजधानी असे म्हटले जाते. याच राजगडावरून शिवाजी महाराजांनी दोन दशकांपेक्षा जास्त अधिक काळ कारभार पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, जपले आणि प्रत्यक्षात आणलेही. त्यामुळे या तालुक्याचे नामांतर करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील वेल्हा तालुक्यास राजगड हे नाव द्यावे. यासाठी मी पाठपुरावा करीत आहे. याबाबत तत्कालिन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. आता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेतून आलेल्या या मागणीचा विचार करुन वेल्हे तालुक्यास राजगड हे नाव द्यावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. विशेष म्हणजे जुन्या दस्तावेजात म्हणजे अगदी शिवकाळापासून ते 1947 सालापर्यंत या तालुक्याचा ‘राजगड तालुका’ असाच उल्लेख आढळतो. शासकीय मुद्रणालयाने 1939 साली प्रकाशित केलेल्या पालखुर्द या गावाच्या नकाशात तालुका राजगड असा उल्लेख आहे. याशिवाय इतिहास संशोधन मंडळाकडेही तालुका राजगड उल्लेख आढळतो. हे सर्व मुद्दे लक्षात घेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वेल्हा तालुक्याचे पुन्हा एकदा राजगड असे नामकरण व्हायला हवे, असे सुप्रिया यांनी म्हटलंय.

दरम्यान, तालुक्यातील जनतेचाही या नामकरणासाठी सकारात्मक पाठिंबा आहे. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून राजगड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच ज्या वेल्हा तालुक्यात हा किल्ला आहे. त्या किल्ल्याचे नाव त्या तालुक्यात देण्यात यावे अशी आमची मागणी आहे, असेही सुप्रिया यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केजरीवाल ध्यानधारणेसाठी इगतपुरीत

News Desk

‘भाजपकडे सध्या सीबीआय आणि ईडी हे दोन चंगू-मंगू’, विनायक राऊतांचा हल्लाबोल!

News Desk

बीड ऍसिड हल्ल्याप्रकरणी धनंजय मुंडेंकडून पोलीस प्रशासनाला कठोर कार्यवाहीचे निर्देश

Gauri Tilekar