HW News Marathi
महाराष्ट्र

आता विरोधी पक्षनेता निवडताना तो भाजपमध्ये येणार नाही याची काळजी घ्या !

मुंबई | “आता विरोधी पक्षनेता निवडताना तो भाजपमध्ये येणार नाही याची काळजी घ्या”, असा टोला संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांना लगावला आहे. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करून फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात गृहनिर्माण मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता विखे पाटील यांच्यानंतर विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करावी अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांनी हे खोचक विधान केले आहे.

“ज्याला विरोधी पक्षनेता कराल तो भाजपमध्ये येणार नाही याची काळजी घ्या. कारण, या सरकारच्या कार्यकाळात जे विरोधी पक्षनेते झाले ते सरकारमध्ये आले”, असा टोला विनोद तावडे यांनी विरोधकांना लगावला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यावरून, राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा टीकेला देखील सामोरे जावे लागत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात अश्विनी भिंडेंची नियुक्ती

swarit

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात तलाठी संघटना आक्रमक!

News Desk

नारायण राणेंना पुन्हा एक धक्का! कोर्टाने अटकेपूर्व जमीन फेटाळला

News Desk