HW News Marathi
महाराष्ट्र

ज्या तारखेचा उल्लेख करून नोटीस पाठवली, त्या तारखेला कीर्तन झालेच नाही !

अहमदनगर | गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वादग्रस्त विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या इंदोरीकर महाराजांच्या प्रकरणात एक नवा खुलासा समोर आला आहे. इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.” असे वक्तव्य त्यांनी आपल्या कीर्तनात केले होते. पण ‘मी तसे बोललोच नाही. ज्या तारखेचा उल्लेख करून नोटीस पाठवली, त्या तारखेला कीर्तन झालेच नाही असे विधान इंदोरीकरांनी केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मात्र, मुंबईतील एका वृत्तपत्रात त्यांच्या या विधानाची बातमी छापून आली होती. बातमीदारांना मग कुठून पुरावे मिळाले याची विचारणा केली असता त्याचे उत्तर अद्याप इंदोरीकरांनी दिले नाही आहे. त्यामुळे इंजोरीकर महाराजांवर लगेचच कारवाई करणे शक्य नाही असे अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी स्पष्ट केले आहे.

मुला-मुलींच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर झालेल्या गदारोळानंतर इंदोरीकर महाराजांनी माफी मागणारे पत्रक मंगळवारी (१८ फेब्रुवारी) प्रसिद्ध केले होते. ‘मी जे काही बोललो आहे, ते माझ्या अभ्यासानुसार बोललो आहे. माध्यमांनी त्याचा विपर्यास केला आहे. तरीही वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो,’ अशा आशयाचे पत्र त्यांनी लिहिले होते. दरम्यान, भूमाता ब्रिगेडने यावर आक्षेप घेत त्यांच्यावर ४ दिवसांत गुन्हा दाखल न झाल्यास त्यांना काळं फासू असा इशाराही दिला होता. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या युट्युब चॅनेलने हा व्हिडीओ अपलोड केला होता, त्या चॅनेलने वादानंतर संबंधित व्हिडीओ डिलीट केला आहे. संबंधित प्रकरणाचा व्हिडिओच नसल्याने आता इंदोरीकर महाराज ‘आपण ते वाक्य बोललोच नाही’, असे ठामपणे बोलत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हा महाराष्ट्र आहे, पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल, सामनातून मोदी सरकारवर टीका

News Desk

शरद पवार नाराज असतील तर हे महाराष्ट्राचं मोठं नुकसान!

News Desk

मागच्या 5 वर्षांमध्ये भोंगे नव्हते का आणि तेव्हा अजान होत नव्हते का?, भाई जगतापांचा राज ठाकरेंना सवाल

Aprna