मुंबई। माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील दोन गुन्ह्याची माहिती लपवल्याच्या आरोपावर आज (२० फेब्रुवारी) नागपूर न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासाठी फडणवीस हे नागपूर न्यायालयात हजर राहणार आहेत.
फडणवीसांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना, प्रतिज्ञापत्रात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविरोधातील दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करत अॅड सतीश उके यांनी तक्रार दाखल केली होती. याआधी नागपूर न्यायालयाने समन्स बजावून देवेंद्र फडणवीस यांना हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, त्यावेळी त्यांचे वकील न्यायालयात हजर होते. यानंतर आज होणाऱ्या सुनावणीला फडणवीस हजर राहणार आहे.
नेमके काय आहे प्रकरण
देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील आमदार आहेत. फडणवीसांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लवपल्याचा आरोप करण्यात आला होता. या दोन गुन्ह्यापैंकी एक गुन्हा मानहानीचा आणि दुसरा गुन्हा फसवणुकीचा असल्याची माहितीसमोर आली आहे. फडणवीस यांच्याविरुद्ध ४ मार्च १९९६ आणि ९ जुलै १९९८ ला दोन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यात त्यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयातून ३ हजार रुपये व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मिळाला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.