HW News Marathi
महाराष्ट्र

‘शिवाजीचे उदात्तीकरण’ पुस्तकावर भाजपच्या मागणीनंतर बंदी येणार ?

नागपूर | छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उद्या ( १९ फेब्रुवारी) आहे. त्यापूर्वी शिवाजी महाराजांवर आधारित ‘शिवाजीचे उदात्तीकरण पद्यामागचे वास्तव’ या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी नागपुरात एक पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कुलकर्णींनी मुख्यमंत्र्यांना या पुस्तक बंदी करण्यासाठी पत्रही पाठवले होते.
या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानजनक लेखन करण्यात आले आहे. या पुस्तकाचे लेखन विनोद अनाव्रत यांनी केले असून पुस्तक प्रकाशित करणारे सुगावा प्रकाशक यांच्यावरही कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. या पुस्तकातील महाराजांवर लिहिण्यात आलेला मजकूर वाचताना अतिशय संताप होतो. या पुस्तकातील काही उतारे विशिष्ठ समुदायाचे लोक सोशल मीडियावर प्रसारित करत आहेत. दरम्यान, या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज, मराठा समाज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करत जनमानसात द्वेष निर्माण करणारे हे पुस्तक आहे, असे कुलकर्णींनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे.
शिवाजीचे उदात्तीकरण या पुस्तकाचे शीर्षकही चुकीचे आहे. कारण त्यात महाराजांचा उल्लेख एकेरी केला आहे. दरम्यान, अशी अनेक कारणे देत भाजपने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे आणि या संबंधी अमरावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीनंतरच मेगा भरती

News Desk

पर्यावरण दिनानिमित्त उद्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा सन्मान

Aprna

“राणेजी, बाळासाहेबांनी खोटं बोलणाऱ्यांना काढूनही टाकलेलं लक्षात असुदे”- मुख्यमंत्री

News Desk