HW News Marathi
महाराष्ट्र

राजेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांनी केले निंबाळकरांच्या पुतळ्याचे दहन

मुंबई | निरा-देवधरच्या पाण्यावरून सातारा जिल्ह्याचे राजकारण पेटले आहे. यात विधानसभेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत. रामराजेंनी उदयनराजेंवर स्वयंघोषित छत्रपती अशा शब्दात टीका केल्यानंतर उदयनराजे भोसले समर्थकांनी आज (१५ जून) दुपारी पोवई नाक्यावर रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

निरा देवधरच्या पाण्यावरून उदयनराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर टीका केल्यानंतर शुक्रवारी (१४ जून) रामराजेंनी पत्रकार परिषदेतून तिघांवर पत्रकार परिषदेत टीका केली होती. यावेळी रामराजेंनी उदयनराजेंना स्वयंघोषित छत्रपती म्हणून संबोधले होते. छत्रपतींबाबत सातारा जिल्हाच नव्हे तर राज्यात कोणीही अपशब्द वापरल्यास त्याला सडेतोड उत्तर देऊ असा इशारा उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी प्रतिष्ठानचे नितीन शिंदे, संतोष घाडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

उदयनराजे यांचे रामराजेंनी सडेतोड उत्तर

रामराजेंनी केलेल्या टीकेला उदयनराजे यांनी सुद्धा उत्तर म्हणाले की, “माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात ठेवली असती, असे सडेतोड उत्तर उदयनराजेंनी रामराजे यांना दिले आहे. लोकांवर अन्याय होत असेल तर डोके फिरते, लोकांचे कामाचे विषय मार्गी लावायचे असतील तर मी चक्रम होतो. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे आम्ही सहन करणार का? असा प्रश्न उदयनराजे यांनी यावेळी उपस्थित केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आता सामान्य लोकांनी विमानाचा…” रोहित पवार

News Desk

काँग्रेसचे राज्यव्यापी ‘जीवनदान महाअभियान’ रक्तदान शिबिर ! | बाळासाहेब थोरात

News Desk

आदर्श सरपंच असलेल्या भास्कर पेरे पाटलांचा पराभव तर हिवरे बाजारमध्ये ३० वर्षांनी झाली निवडणुक

News Desk