HW News Marathi
महाराष्ट्र

उदयनराजे-निंबाळकर यांच्या वादात शरद पवारांची मध्यस्थी

मुंबई | साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषधेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वादावर तोंडगा काढण्यासाठी आता खुद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. पवार, निंबाळकर आणि भोसले या तिघांमध्ये शनिवारी (१५ जून) बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली.

नीरा देवधरच्या पाणी वाटपावरून राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची पाठ थोपटताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे उदयनराजे यांच्या या वक्तव्याने संतापलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी “उदयनराजेंना आवरा, अन्यथा आम्ही पक्षातून बाहेर पडू”, असा थेट इशारा पवार यांना दिला आहे.

“शरद पवार यांनी मीटिंग बोलावली आहे. त्यात मी पवारांना सांगणार आहे कि तुमच्या खासदाराला आवरा नाहीतर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत”, असा इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी शुक्रवारीच (१४ जून) दिला होता. दरम्यान, या चर्चेतून निंबाळकर आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटविण्यात शरद पवार यशस्वी ठरणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे अ‍ॅक्शनवाला माणूस !

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक

News Desk

‘त्या’ शपथविधीचा खुलासा करण्यापासुन अजित पवारांना फडणवीसांनी थांबवल….

Arati More