HW News Marathi
महाराष्ट्र

राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदीच बांधणार !

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी (१६ जून) सकाळी १० वाजता, अयोध्येतील रामल्लाचे दर्शन घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर आयोध्येत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शिवसेनेचे विजयी १८ खासदारांसह उद्धव ठाकरे आज (१५ जून) सायंकाळी अयोध्येत दाखल होणार आहे. राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बांधणार, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.

राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्याच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. राऊत यांनी मंत्रिमंडळाबाबात बोलण्यास टाळाटाळ केली आहे. राऊत पुढे असे देखील म्हणाले की, शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा कधीही राजकीय मुद्दा म्हणून समोर आणला नाही. तसेच प्रभू रामचंद्राच्या नावाने मते मागितली नाहीत, असे राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर अयोध्येत येणार असल्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. ते वचन पूर्ण करण्यासाठीच ते येथे येणार आहेत.

‘भाजप आणि एनडीएला बहुमत मिळाले आहे. हा आम्ही प्रभू रामचंद्राचा आशीर्वादच समजतो. तसेच समान नागरी कायदा आणला जावा, कलम ३७० हटवले जावे आणि राम मंदिराच्या निर्मितीचे काम सुरू व्हावे या आमच्या मुख्य मागण्या आहेत. देशाला अमित शहा यांच्या रूपाने एक सक्षम गृहमंत्री मिळाले आहेत त्यामुळे हे प्रश्न सुटतील असे ही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१० रुपयांच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस !

swarit

“मग आम्ही का बिन काळजीचे आहोत का?”, अजित पवार विरोधकांवर भडकले  

News Desk

मुख्यमंत्र्यांची कॉंग्रेससह शिवसेनेवर सडकून टीका

News Desk