मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक दौऱ्या रद्द करून पक्षाच्या १६ मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. आज (१७ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादीच्या १६ मंत्र्यांच्या बैठकीला मुंबईतील यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये सुरुवात झाली आहे. या बैठकीत एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपविल्या प्रकरणी शरद पवार चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जाते. या बैठकीत नेमके काय घणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीस उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना कॅबिनेट तसेच राज्यमंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. कायदा सुव्यवस्था हा राज्याचा विषय असताना केंद्र सरकारने परस्पर हा तपास स्वत:कडे घेणे अयोग्य आहे. शिवाय, त्याला राज्याने मान्यता देणे त्याहून अयोग्य आहे. तपासाची सूत्रे एनआयएकडे गेली असली तरी राज्याने स्वतंत्र तपास करावा, अशी भूमिकाही पवारांनी कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत मांडली होती.
शरद पवार १६ मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील हे बारा कॅबिनेट मंत्री आहेत. तर दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे हे चौघे राज्यमंत्री आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.