HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या सातबाराची कटकट मिटणार

सांगली |आपला सगळ्यांचा अन्नदाता शेतकरी कायमच अनेक हालअपेष्टा सोसत असतो. पण आता शेतकऱ्यांच्या मागे असणाऱ्या कटकटी हळूहळू मिटणार असल्याची काहीशी चिन्हे दिस आहेत. शेतकऱ्यांच्या मागे असणारी सातबाराची कटकट आता संपणार असून सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागणारी पळापळ यातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा आता ऑनलाईन उपलब्ध करुन दिला जाणार असल्याने शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांचे ज्या कार्यालयात काम आहे, त्या कार्यालयातूनच हा सातबारा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. दरम्यान, याबाबतचे शासकीय परिपत्रक लवकरच निघणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगलीतील कडेगावमध्ये बोलताना दिली.

राज्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा आणि खाते उतारा ऑनलाईनचे काम बऱ्याच काळापासून सुरु होते. आता हे काम जवळपास पूर्ण व्हायला आल्याने याबाबतचे परिपत्रक निघाल्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी बँकेत किंवा शासकीय कार्यालयात सातबारा घेऊन फिरण्याची गरज नाही. कार्यालयातील संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना त्या शेतकऱ्याचा सातबारा उतारा ‘डाऊनलोड’ करुन घेता येईल.

अनेक काळापासून शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुर्णत्वास नेला नव्हता. आता राज्यातील शेतकऱ्यांचे सातबारा ऑनलाईन करण्याचे सर्व काम पूर्ण होत असून लवकरच याची कार्यवाही देखील होणार आहे. शेतकरी वर्गाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. ऑनलाईन सातबाराची प्रक्रिया करताना ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत त्या दुरुस्त करुन घ्याव्यात अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुधाचे दर वाढण्याची शक्यता

News Desk

#SushantSinghRajputDeathCase – सर्वसामान्यांसाठी मुंबई सुरक्षित नाही, अमृता फडणवीस यांची टिका

News Desk

कोल्हापूरमध्ये ‘आमचं ठरलयं विकास आघाडी’ या पक्षाला निवडणूक आयोगाकडून मान्यता

News Desk