HW News Marathi
राजकारण

विधानसभा पार पडेपर्यंत अमित शहाच राहणार भाजप अध्यक्ष ?

नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. मात्र, आता येत्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतरच भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती होईल. तोपर्यंत अमित शहाच भाजपचे अध्यक्ष राहतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर देशात पुन्हा मोदी सरकार आले. ३० मे रोजी पार पडलेल्या मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली.

मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात अमित शाह यांना केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. भाजपच्या नियमानुसार भाजपमधील कोणताही नेता एका वेळी २ पदे भूषवू शकत नाही. त्यामुळे, आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, देशातील येत्या विधानसभा निवडणूक पार पडेपर्यंत अमित शहा हेच भाजपचे अध्यक्ष राहतील, अशी माहिती मिळत आहे. म्हणजेच, २०२० साली भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती होईल, अशी माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदी एखाद्या सडकछाप माणसाप्रमाणे बोलतात, मेमन यांची जीभ घसरली

News Desk

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे विधानभवनाबाहेर आंदोलन

News Desk

नगरमध्ये सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांना उमेदवारी

News Desk