कोरेगाव येथे शौर्यदिना निमित्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठीं आलेल्या हजारो भीमसैनिकांवर विघ्न संतोषी समाजकंटकानी भ्याड हल्ला करीत दंगल घडविण्याचा प्रयत्न केला या घटने निष्पाप भीमसैनिक जखमी झाले तर अनेकांना जीव गमवावा लागला आहे .या घटनेने भीमा सैनिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहे.या घटनेच्या निषेधार्थ डोंबिवली शहरातील भीम सैनिकानी रस्ता रोको करीत उत्फूर्तपणे बंद पाळला . भीमा कोरे गाव येथे डोंबिवलीपूर्वे कडील इंदिरा नगर शेलार नाका परिसरातील भीम सैनिक मानवंदना देण्यासाठी गेले होते त्यातील चार ते पाच भीमसैनिक या भ्याड हल्ल्याच्या घटनेत गंभीर पाने जखमी झाल्याचिं माहिती कळताच इंदिरा नगर परिसरातींल आंबेडकरी जनते मध्ये संतापाचे वातावरण पसरले निषेधाच्या घोषणा देत अचानक रस्त्यावर उतरून ये – जा करणाऱ्या वाहनांवर दगडफेक सुरू केली. या जमावाने पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत जवळपास 10 – 12 वाहने फोडली. भीमसैनिकांनी जागोजागी शहरात बंद पाळण्यास सुरुवात केली. डोंबिवली शहरातील अनेक भागात आंबेडकरी अनुयायी राहत असलेल्या वसाहतीत सकाळपासून भीमसैनिकानी बंद पाळला दरम्यान या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली सह आसपासच्या परीसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करत पोलिसांनी या परिसरात शांततेचे आवाहन केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.