HW News Marathi
महाराष्ट्र

भीमा कोरेगाव येथे झालेल्या जाळपोळ व दगडफेकीच्या निषेधार्थ बदलापुरात कडकडीत बंद

भीमा कोरेगाव येथे झालेल्या जाळपोळ व दगडफेकीच्या निषेधार्थ बदलापुरातील रिपब्लिकन पक्षांच्या विविध गट, संघटना आदींनी एकत्र येत बदलापूर बंदची हाक दिली होती. त्यानुसार बदलापूर पूर्व व पश्चिम भागात बाजारपेठा बंद होत्या. रिक्षा सेवाही बंद राहिली. निषेध मोर्चाचेही आयोजन करण्यात आले. बदलापूर पश्चिमेकडील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली. पुढे हा मोर्चा बाजारपेठ, उड्डाणपूल, पालिका मुख्यालय, पूर्वेतील रेल्वे स्थानक मार्गे महात्मा गांधी चौक ते शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आला. मात्र मोर्चेकरी पुढे कर्जत महामार्गाकडे वळाले. मोर्चा दत्तवाडीतून थेट कात्रपच्या घोरपडे चौकात महामार्गाद्वारे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मोर्चा घोरपडे चौकात थांबल्यानंतर तेथेही काही काळ मोर्चेकऱ्यांना परतवण्यासाठी पोलिसांनी विनंती केली. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे कर्जत महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, बंदमुळे दुकाने, बाजारपेठ बंद राहिल्याने अनेक रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालक व शिक्षण विभागाने सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका ठेवावी! – डॉ.नीलम गोऱ्हे

Aprna

नुकसानीचे पंचनामे करा: पालकमंत्री एकनाथ शिंदे

News Desk

ईडी कडून ज्यांना नोटीस गेली ते अनिल परब नेमके कोण आहेत?

News Desk