HW News Marathi
महाराष्ट्र

भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटना अतिशय दुःखद,घटनेची चौकशी करून सरकार दोषींवर कारवाई करणार- छगन भुजबळ

मुंबई | भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला असून ही घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेची सखोल चौकशी करून सरकार दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत दुर्दैवाने मृत्यू झालेल्या लहान मुलांबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेची चौकशी करून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी सरकार प्रयत्न करेल असे मत देखील मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची कारणे काय आहेत हे तपासायची गरज आहे. अनेक रूग्णालये, नर्सिंग होम यांची फायर ऑडिट करण्याची गरज आहे. अनेक रूग्णालयामध्ये वायरिंग वर्षोनुवर्षे बदलली नाही, त्यावरच रुग्णालयातल्या विविध मशीन चालत असतात त्यामुळे ती बदलण्याची गरज असल्याचे मत देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

या दुर्घटनेत त्या हॉस्पिटल मधल्या परिचारीका आणि काही कर्मचाऱ्यांनी ७ बालकांना वाचवले आहे त्या कर्मचाऱ्यांचे आपण आभार मानले पाहिजे पण दुर्दैवाने आपण १० बालकांना वाचवू शकलो नाही. त्या बालकांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी असल्याची भावना देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीला पुन्हा डिवचले

News Desk

‘स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

News Desk

“मनसे, भाजप जवळ येत असतील तर राज्याच्या हिताचे”- दरेकर

News Desk