HW News Marathi
महाराष्ट्र

येत्या २४ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सरू होणार

मुंबई | राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. २०२०-२१ राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमावार (२४ फेब्रुवार) होणार आहे. महाविकासआघाडीला अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी अवघे काही दिवश शिल्लक राहिले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी चार आठवड्याचा निश्‍चित केला असून यात १८ दिवस कामकाज होणार आहे.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (६ मार्च) २०२०-२१ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात तत्कालिन भाजप-शिवसेना युती सरकारने केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी अकरा महिन्यांत फक्त ४१.९८६ टक्केच निधीच खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. नवीन आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यास काही दिवस उरलेले असताना मागील अर्थसंकल्पातील ६० टक्के रक्कम अद्याप खर्चच झालेली नाही.

नव्या सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प किमान ४० हजार कोटींच्या तुटीचा असणार आहे. सरकारच्या ‘बीम्स’ प्रणालीवर प्रत्येक विभागासाठी किती तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आणि त्यापैकी किती रक्कम खर्च झाली याचा आढावा असतो.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नौका उलटली; पण मोबाइलने तारले

News Desk

बाळासाहेबांचे ‘हे’स्वप्न पुर्ण करण्याचा निर्धार करूया,अजित पवारांची बाळासाहेबांना श्रद्धांजली!

News Desk

महाराष्ट्राला बलशाली करूया; विजयादशमी-दसऱ्यानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा

Manasi Devkar