HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या उपस्थितीत हर्षवर्धन जाधवांचा मनसेत प्रवेश

मुंबई | कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी आज (८ फेब्रुवारी) मनसेत प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेले व्यक्तिमत्त्व आहे. जाधव हे भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांच्यासोबत नांदेड शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कौटगे आणि माजी शहरप्रमुख सुहास दशरथे यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला आहे.

हर्षवर्धन जाधव सर्वप्रथम मनसेच्या तिकिटावरच आमदार झाले होते. पण नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अपक्ष, मनसे, शिवसेना, पुन्हा अपक्ष असा प्रचंड विस्कळीत राजकीय प्रवास करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी आजपर्यंत सतत वादात राहिलेले व्यक्ती आहेत. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे कधीच आयुष्यात खासदार होणार नाही, हे मी लिहून देतो, अशी टीका हर्षवर्धन जाधव यांनी चंद्रकांत खैर यांच्यावर केली आहे.

हिंदुत्त्वाचे वळळ घेतल्यानंतर मनसेचे पहिला मोर्चा

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी (९ फेब्रुवारी) मोर्चाचे आयोजन केले आहे. मनसे हिंदुत्वाची कास हाती घेतल्यानंतर पहिला मोर्चा आहे. या मोर्चासाठी मनसेकडून सोशल मीडियावर जोरदार प्रचार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघ आणि वॉर्डावॉर्डातून फ्लेक्स आणि बॅनरद्वारे नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

असा आहे मनसेच्या मोर्चाचा मार्ग

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी मनसे मोर्चा काढत आहे. हा मोर्चा उद्या (९ फेब्रुवारी) गिरगाव चौपाटी येथील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येईल. दुपारी बारा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून, आझाद मैदान येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाने मोर्चाची सांगता होईल. या मोर्चाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी मनसेने केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचे निर्देश

Aprna

मूर्ती विमानतळासाठी सर्व परवानग्या तीन महिन्यात मिळवा! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

“आमच्या आई-बहिणीला नग्न केलं जातं या महाराष्ट्रात आणि आम्ही नोंद घेतो,” मुनगंटीवारांनी गृहमंत्र्यांना सुनावले

News Desk