HW News Marathi
मुंबई

बांद्रामधील अनधिकृत झोपडपट्टी वासियांचे माहुलमध्ये होणार स्थलांतर

मुंबई | बांद्रा पूर्व एच-पूर्व विभागातील चमडावाली नाल्याच्या बाजुला असलेल्या ९०० अधिकृत व अनधिकृत झोपडपट्टी वासियांचे महानगरपालिकेकडून माहुल आणि मालाड येथे स्थलांतर करण्यात येणार आहे. बांद्रामधील नालारूंदीकरणास्तव झोपडपट्टी वासियांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या झोपडपट्टीमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या झोपडपट्टींवासियांचे मालाड व पहिल्या मजल्यावरील झोपडपट्टीवासियांचे स्थलांतर माहुल येथे होणार आहे.

बांद्रा पूर्वमधील नाल्याचे रूंदीकरण न झाल्यामुळे स्थानिकांना पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्यांना गेली १० वर्षे सामोर जावे लागत होते. यामुळे झोपडपट्टी वासियांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. या नाल्याचे रूंदीकरण झाल्यानंतर या नाल्यातून पाण्याचे योग्य निसरण होईल. नाला रूंदीकरणामुळे झोपडपट्टीवासिय बेघर होऊ नयेत. यामुळे महापालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपाचा निवास म्हणून माहुल आणि मालाड देण्यात आला आहे.

महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. झोपडपट्टी वासियांनी एसआरएच्या नियमाणुसार पात्रात सिद्ध केल्यावर त्यांना त्यांच्यी हक्काची घरे मिळतील. मात्र, या स्थलांतरामुळे आणि नाला रूंदीकरणामुळे पावसाळ्यात बांद्रामध्ये साचत असलेल्या पाण्यापासून बांद्रा वासियांना मुक्ती मिळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तर उरलेल्या तुरीचे शेतकऱ्यांनी पकोडे तळायचे का? : विखे पाटील

swarit

बाप्पाच्या मुर्ती साकारण्यास सुरुवात , आदिवासी मुलांना रोजगार

swarit

मुंबई पोलिसांच्या डोक्यावर लवकरच नव्या टोप्या

News Desk