HW News Marathi
Uncategorized

बारावा वाढदिवस साजरा केला, तोच ठरला चौघांचा अखेरचा दिवस

नवी दिल्लीः. आपल्या मुलीचा बारावा वाढदिवस मोठ्या धमाक्यात साजरा केल्यानंतर आनंदात झोपलेल्या एका कुटुंबावर भयंकर संकट कोसळले. मध्यरात्री पार्किंगमधील गाड्यांना आग लागल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा धुरात गुदमरुम मृत्यू झाल्याची घटना दिल्लीत घडली.

वाढदिवस साजरा करून एक कुटुंब सुखरुप झोपले होते. परंतु कोणीतरी पार्किंगमधील गाड्यांना आग लावली. त्या आगीत पहिल्या मजल्यावर राहण्याऱ्या एका दाम्पत्याला मोठी किमंत मोजावी लागली. आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे पहिल्या मजल्यावरील एका कुटुंबीतील चार जणांचा गुदमरूम मृत्यू झाला. यातील एक मुलगी बारा वर्षाची होती. तिचा आदल्या रात्री मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. परंतु या घटनेने संपूर्ण कुटुंब उद्वस्त झाले. सर्वजण धुरामुळे मृत्यूमुख पडल्याचे दिसून आले. कारण सर्वजण घराबाहेर पायऱ्यावर आढळून आले आहेत. यात मुलीची आई वाचली असून इतर सर्व जण दगावले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोग कार्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती

News Desk

भारताची पदकांची लयलूट, प्रमोद भगतला सुवर्ण!

News Desk

कर्नाटकचे नव्या मुख्यमंत्री पदाची माळ बसवराज बोम्मईकडे….!

News Desk