HW News Marathi
देश / विदेश

दीड लाख लोक मंगळवार जाणार

नवी दिल्लीः मंगळ ग्रहावर जाण्यासाठी भारतातील दीड लाख जणांनी नासाकडे नावे नोंदवली आहेत. नासाने पुढील वर्षी मंगळावर जाण्यासाठी एक मोहीम आखली आहे. अर्थात, या लोकांना प्रत्यक्षात मंगळावर जाता येणार नाही तर त्या मोहिमेचा बोर्डिंग पास त्यांना दिला जाणार असून, त्यांनी नावे कोरलेली एक पाटी इनसाइट यानाबरोबर पाठवली जाणार आहे. इनसाइट म्हणजे इंटिरिअर एक्स्प्लोरेशन युजिंग सिसमिक इन्व्हेस्टिगेशन, जिओडेसी अँड हीट ट्रान्सपोर्ट असे यानाचे पूर्ण नाव आहे.

ज्यांनी नासाकडे नावे नोंदवली आहेत त्यांना ऑनलाइन बोड्रिंग पास दिले जाणार आहेत. त्यांची नावे सिलिकॉनच्या पातळ पट्टीवर कोरली जातील, त्यासाठी इलेक्ट्रॉन शलाकेचा वापर केला जाईल, त्यामुळे अक्षरे मानवी केसाच्या व्यासाच्या एकहजारांश इतक्या लहान आकारात उमटतील, त्यामुळे लहान पट्टीवर एवढी १.३ लाख नावे बसवली जातील. नावांची ही पाटी इनसाइट लँडर यानाच्या डेकवर लावली जाईल व ती नंतर मंगळावर कायम राहील. इनसाइट यान ५ मे रोजी मंगळाकडे झेपावणार असून, मंगळ मोहीम नावनोंदणीसाठी भारतीयांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना चाचणीसाठी आता सर्वात स्वस्त टेस्टिंग किट बाजारात उपलब्ध!

News Desk

दिल्लीच्या औरंगजेब रोडवर स्फोट,बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल

News Desk

Republic Day | ‘एक झेंडा हिरवळीचा’ शालेय विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम

News Desk