HW News Marathi
मनोरंजन

करिष्मा कपूर करणार दुसऱ्यांदा लग्न

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर दुसऱ्यांदा लग्न करणार आहे.. सध्याचा तिचा प्रियकर व उद्योगपती संदीप तोष्नीवाल यांच्यासोबत ती संसार थाटणार असल्याचे बोलले जातेय. करिष्माचे वडील, अभिनेते रणधीर कपूर यांनीही तिच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना करिष्माने उद्योगपती संजय कपूर याच्याशी लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात मतभेद झाले. प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर मागील वर्षी तिचा संजय कपूरशी रीतसर घटस्फोट झाला. त्यानंतर वर्षभरातच तिच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. करिष्माला संजय कपूरपासून दोन मुले आहेत. करिष्माचा नवा प्रियकर संदीप तोषनीवालही घटस्फोटित आहे. त्याने पत्नी अर्शिताला घटस्फोट दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#IndianNavyDay : समुद्री चाच्यांचे जहाज लुटण्याचे ४४ प्रयत्न फसले

News Desk

‘मणिकर्णिका’ सिनेमाला ब्राम्हण सभेचा विरोध

News Desk

Ganesh Chaturthi 2018 | मुंबईत हिऱ्यामध्ये अवतरले बाप्पा

News Desk