HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीमुळे सत्तेची संधी गेलीः पृथ्वीराज चव्हाण

मुंबईः कॉँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यात पंधरा वर्षे सत्ता सांभाळली. परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांचे हितसंबंध असणाऱ्या शिखर बँकेवर प्रशासक नेमल्याने तसेच सिंचन घोटाळ्यासंदर्भात चौकशी सुरू केल्याने आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळेच आम्ही सत्तेपासून दूर राहिल्याची प्रतिक्रीया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

शिखर बँकेवर प्रशासक नियुक्त केल्यावर तोटय़ातील बँक नफ्यात आली. तसेच सिंचनाबाबत आरोप होत असल्याने श्वेतपत्रिका काढली. यामुळे मित्रपक्ष राष्ट्रवादी नाराज झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतांची टक्केवारी ३५ टक्के आहे तर भाजपची २७ टक्के आहे. यामुळे निवडणूक मिळून लढावी, असे मी सांगत होतो. परंतु मित्रपक्ष यासाठी तयार नव्हता. त्याचा लाभ भाजपला झाला, मात्र या वेळी आम्ही आघाडीसाठी तयार आहोत, असे चव्हाण म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र, मुंबई विरोधात बोलणाऱ्या लोकांची पुढची पावले राजकारणाचीच!

News Desk

‘बेळगाव महापालिकेत भाजपचा झेंडा फडकला!’

News Desk

अमित शहांचे विमानतळावर स्वागत, कलम ३७० रद्द केल्याबद्दल ३७० तोफांची सलामी

News Desk