HW News Marathi
देश / विदेश

काश्मीरच्या अनंतनागमध्ये एका दशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर | जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील नौगाम शाहबाग भागात आज (८ जून) पहाटे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळातच लष्कराने शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी दोन्ही बाजूनी गोळीबार सुरू झाला.

लष्कराने ठाकर केलेल्या दहशतवाद्याचे नाव इकबाल असून तो जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. गुप्तचर यंत्रणांनी वेरिनाग भागातील एका घरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी या भागात शोध मोहीम सुरू केल्यानंतर दहशतवादी व जवानांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

JEE मुख्य परीक्षेसाठी १२वीत 75 टक्के गुणांची अट रद्द

News Desk

UP Election 2022: अखिलेश यादवांना फक्त दलितांची मते हवीत! – चंद्रशेखर आझाद

Aprna

‘सायकलवर फिरून कर्नाटकात…”, येडियुरप्पा राजीनामा देताना झाले भावुक

News Desk