HW News Marathi
मुंबई

10 वर्षाच्या मुलावर अत्याचार

मुंबई सांताकृज परिसरात 10 वर्षाच्या मुलावर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकऱणी पोलिसांनी पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. विजय शिंदे असे आरोपीचे नाव आहे.घटना मंगळवारी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकोला परिसरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोपी विजय शिंदे आला होता. आरोपीने पीडित मुलाला आमिष दाखवून शेजारी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत नेले आणि त्यानंतर त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे मुलगा घाबरला. त्याने आरोपीला प्रतिकार केला आणि त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून तेथून पळ काढला.

पीडित मुलगा आणि आरोपी विजय शिंदे याला पळताना एका रहिवाशाने पाहिले होते. त्याने तातडीने मुलाच्या आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. घरच्यांनी मुलाला विश्वासात घेऊन विचार पुस केले असता मुलाने त्याच्यासोबत घडलेली घटना सांगितली. हे ऐकून मुलाच्या घरच्याना धक्का बसला. मुलाच्या घरच्यांनी लगेच पोलिसात तक्रार केली असता. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपीला जेरबंद केले. कोर्टाने आरोपीला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक ! राज्याचा आकडा ६३५ वर पोहोचला

News Desk

शेतकऱ्यांचा लाँग मार्च मोर्चाला माओवाद विचारसरणी डोकावत आहे | पूनम महाजन

News Desk

सीएसटी जीआरपी पोलिसांकडून चालत्या रेल्वेत पर्स ओढणाऱ्या आरोपीला अटक

swarit