HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते 20 शाखांचे अनावरण

पाथरी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या आदेशावरुन व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या सुचनेवरुन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य भर 5000 शाखेचा करण्याचा संकल्प आहे. तर पाथरी येथे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते 20 शाखांचे उद्घाटन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मजबुत संघटनाच्या अनुषंगाने युवकांची फळी मजबुत करण्याच्या अनुषंगाने पाथरी शहरात आज रा.यु.काँच्या वीस शाखांचे उद्घाटन रा.यु.काँचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रदेश युवक नेते महेबुब शेख, अध्यक्ष माजी नगराध्यक्ष व गटनेते तथा जुनेद भैय्या दुर्राणी, प्रदेश युवक नेते महेबुब शेख, परभणी युवकांचे जिल्हाध्यक्ष शांतीस्वरुप जाधव, अ‍ॅड.मंजीत सुगरे, माजी जि.प. सभापती दादासाहेब टेंगसे, रा.काँ.तालुकाध्यख एकनाथराव शिंदे, सुनिल उन्हाळे, नितेश भोरे, रा.यु.काँचे तालुकाध्यक्ष सतिष वाकडे, शहराध्यक्ष खालेद शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कार्तिक घुबरे पाटील, अल्पसंख्यांक सेलचे मुबारक चाऊस अहेमद अत्तर, बाळासाहेब आत्तार, कृष्णा कांबळे, शेख इरफान, शफी अन्सारी, अजयसिंह पाथरीकर, यासिन खान पठाण, अकबर खान आणि पाथरी शहरातील सर्व प्रभागांचे नगरसेवक यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. या इंदिरा नगर येथील पहिल्या शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर गौतम नगर, सागर कॉलनी, जायकवाडी कॉर्नर, भिमनगर, बैयकार मोहल्ला, कुरेशी मोहल्ला, शिंदे गल्ली, चाबुकस्वार मोहल्ला, विलास गोपले नगर, लहूली नगर, जैतापूर मोहल्ला, रसाळ गल्ली, नामदेव नगर, माळीवाडा, हुसने आलम मोहल्ला, पारमोहलल्ला, एकतानगर, अहिल नगर या ठिकाणच्या शाखांचेय उद्घाटन करण्यात आले. यानंतर सांगतेचा कार्यक्रम नगर परिषदेच्या सभागृहात संपन्न झाला.

शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विविध आघाड्या, सेलच्या माध्यमातून मोठी फळी निर्माण केली आहे. ही फळी कौतुकास्पद असून सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी एकत्रितपणे समन्वयाने ठेवून कामे करून जनतेच्या कामाला वाव घावी.व पाथरी मतदारसंघातील युवकांनी गाव तिथे शाखा स्थापन करण्याचा संकल्प करावा. तसेच येणार्‍या आगामी निवडणूकांत युवकांनी विजयासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे, प्रदेश उपाध्यक्ष मा,श्री,डॉ संतोष मुंडे यांनी पाथरी येथे रा.युवक काँ.च्या कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

यावेळी प्रदेश युवक नेते शेख महेबुब, जुनेदभैय्या खान दुर्राणी, जिल्हाध्यक्ष शांतीस्वरुप जाधव, दादासाहेब टेंगसे, यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजयसिंह पाथरीकर यांनी केले तर अभार शेख खालेद यांनी मानले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का? ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सदाभाऊ खोतांचा पवारांना सवाल!

News Desk

सरसकट शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर…

News Desk

हत्तीची चाल, वजिराचा रुबाब म्हणजेच ‘लोकप्रिय नेता’ शरद पवार – सामना

News Desk