नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती लवकर सुरू करणार असल्याचे आज (५ फेब्रुवार) मोदींनी लोकसभेत सांगितले. मोदी लोकसभेत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती पंतप्रधानांनी लोकसभेत दिली.
PM Modi in Lok Sabha: We have readied a scheme for the development of Ram Temple in Ayodhya. A trust has been formed, it is called 'Sri Ram Janambhoomi Tirath Kshetra.' pic.twitter.com/LOWDqzvuLU
— ANI (@ANI) February 5, 2020
दरम्यान मोदी म्हणाले, राम जन्मभूमीच्या आणि राज मंदिर निर्मितीच्या विषयावर मी बोलत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला ६७ एकर हस्तांतरित करण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केली. तर ६ एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्डालाही देणार असून उत्तर प्रदेश सरकारने याला मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.