HW News Marathi
देश / विदेश

चंदा कोचर यांच्याविरोधात सीबीआयचे लूकआऊट नोटीस जारी

मुंबई | व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात दोषी आढळलेल्या चंदा कोचर यांच्याविरोधात सीबीआयचे लूकआऊट नोटीस जारी केली आहे. यानंतर चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. चंदा कोचर या देश सोडून जावू नये म्हणून सीबीयाने सर्व विमानतळांवरील इमिग्रेशन विभागाला कळाविले आहे. सीबीआयने २२ जानेवारी रोजी कोचर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पदांचा गैरवापर करत मर्जीतील लोकांना आर्थिक फायदा दिल्याच्या आरोपावरून चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडीओका इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चंदा कोचर यांनी नियमबाह्य पद्धतीने व्हिडीओकॉन कंपनीला तब्बल ३२५० कोटींचे कर्ज दिले होते. मात्र, व्हिडीओकॉन कंपनीने ते कर्ज बुडविले आणि त्यानंतर चंदा कोचर यांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला. चंदा कोचर यांनी व्हिडीओकॉनला हे कर्ज देताना त्यांच्या वैयक्तिक हिताचा विचार केला आणि स्वतःचा फायदा करून घेतला असा आरोप त्यांच्यावर आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरवाढीला ब्रेक; देशात मात्र…

News Desk

2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात लोकलुभावण्या घोषणांचा मारा

News Desk

कोरोना काळात नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा अभिनव उपक्रम, मोदी साधणार संवाद

News Desk