HW News Marathi
महाराष्ट्र

जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या प्रतिमेला शेण, चपलांचा मारा करत राजीनाम्याची मागणी

धुळे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दारूच्या ब्रॅंडला महिलांचे नाव दिले तर जास्त खप होईल असे वक्तव्य शहादा येथे एका कार्यक्रमात केले होते. याचा धुळ्यात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या महिलांनी तीव्र शब्दात निषेध केला. सोमवारी दुपारी धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात मंत्री महाजन यांच्या प्रतिमेला शेण आणि चपलांचा मार देत आपला रोष व्यक्त करत राजीनाम्याची मागणी केली.

सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात मंत्री महाजन यांनी वरील वक्तव्य केले होते. कारखान्यांनी उत्पादित केलेल्या दारूच्या ब्रॅँडला महिलांचे नाव दिल्यास त्याचा जास्त खप होईल, असा उघड सल्ला त्यांनी जाहीर भाषणातून दिला. महिलांविषयी असे बेताल वक्तव्य करून त्यांनी तमाम महिलावर्गाचा अवमान केला आहे. सत्तेच्या धुंदीत भाजपच्या नेत्यांची जीभ वारंवार घसरत असून मंत्री महाजन हे त्या पैकीच एक वाचाळवीर असल्याचा आरोप राष्टवादीच्या महिला पदाधिका-यांनी केला. राष्टवादी महिला कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा यांच्या नेतृत्वात महिलांनी त्यांच्या प्रतिमेला शेण व चपलांचा मारा देत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडीला कॉंग्रेस ‘या’ कारणासाठी देणार सोडचिठ्ठी

News Desk

एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त जयंत पाटलांचं ‘हे’ गिफ्ट!

Jui Jadhav

मोदी सरकारने चूक मान्य करुन खोटारडेपणा बंद करावा, नाना पटोले भडकले

News Desk