HW News Marathi
मुंबई

योजनांच्या लाभासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी बँक खाते आधारशी जोडावे

मुंबई – समाज कल्याण विभागा मार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता विविध योजना राबविण्यात येतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शाळांना व पालकांना कळविण्यात येते की, 2017-18 या वर्षापासून अनुसूचित जाती, विमुक्त व भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्गात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे अर्ज https://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर भरावेत.

संकेत स्थळावरील योजनेचा लाभ मिळविण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आधार कार्ड स्वत:च्या नावे असलेल्या बँक खात्याशी लिंक करुन घ्यावे,तसेच योजनेचा अर्ज भरण्याबाबत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेशी संपर्क साधावा, असे समाज कल्याण अधिकारी, बृहन्मुंबई यांनी आवाहन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, विठ्ठलवाडी-कल्याणदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली

News Desk

मुख्यमंत्री अडचणीत भीडे, एकबोटेंवर कारवाई अशक्य

Adil

पॅनकार्ड क्लब घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाचा ‘सेबी’ला दणका

News Desk