मुंबई | आयएएस अधिकारी आणि मुंबई महापालिकेत उपायुक्त पालिका उपायुक्त निधी चौधरी यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त ट्वीट प्रकरण तापल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून चौधरींची मुंबई महापालिकेतून मंत्रालयातील पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. निधी चौधरी यांना राज्य सरकारकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
Maharashtra State Government has also issued a show cause notice to Nidhi Choudhari on her controversial tweet on Mahatma Gandhi. She has been transferred from BMC office to Water Supply & Sanitation Department. https://t.co/NaYzhaLsR2
— ANI (@ANI) June 3, 2019
चौधरी यांच्यावर तात्काळ करावाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली होते. यासंदर्भातील पत्र पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठविल. हेच पत्र पवारांनी त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवर ट्वीट देखील केले आहे. एका अधिकाऱ्यांनी असे वक्तव्य करणे ही अत्यंत गंभीरबाब असल्याचे पवारांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.
मुंबई मनपावर उपायुक्तपदी कार्यरत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी निधी चौधरी यांनी राष्ट्रपिता म. गांधींच्या १५०व्या जयंती निमित्ताने भारतीय चलनातील नोटांवरील या महामानवाचे चित्र काढून टाकावे व जगातील त्यांचे पुतळे हटवावेत असे धक्कादायक विधान सोशल मीडियावर केल्याचे समजते. pic.twitter.com/9MEa3ojfkw
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 2, 2019
काय आहे नेमके प्रकरण
“गांधींची १५० वी जयंती साजरी केली जात आहे. हीच योग्य वेळ आहे गांधींचा फोटो नोटेवरुन काढून टाकण्यासाठी आणि जगभरातील त्यांचे पुतळे हटवण्यासाठी. आता आपल्याला एक खरी श्रद्धांजली देण्याची गरज आहे. धन्यवाद गोडसे ३० जानेवारी १९४८ साठी.’ असे ट्वीट निधी चौधरी यांनी केले होते. चौधरींनी १७ मे रोजी गांधींबाबत ट्वीट केले होते. या ट्वीटनंतर वाद पेटल्याने त्यांनी ते ट्वीट डिलीट करून या प्रकरणाची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
वादग्रस्त वक्तव्यानंतर चौधरींची सारवासारव
यानंतर चौधरी यांनी पुन्हा एकदा ट्वीट केले असून यात म्हटले की, ‘काही लोकांचा गैरसमज झाल्यामुळे मी गांधीजींबाबतचे ट्वीट डिलीट केले आहे. तुम्ही २०११ पासून माझी टाईमलाईन पाहिलीत, तर त्यांना समजेल, की मी गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही.’ निधी चौधरी या २०१२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मुंबई महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहत आहे.
https://twitter.com/nidhichoudhari/status/1134520012398456832
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.