नवी दिल्ली | भारतीय हवाई दलाचे एएन-३२ जातीचे मालवाहू विमान अरुणाचल प्रदेशातील मेंचुका एअर फील्डवरून बेपत्ता झाले आहे. एएन हे मालवाहू विमान आज (३ जून) आसाममधील जोरहाट विमान तळावरून दुपारी १२.२५ वाजल्यापासून संपर्क तुटला आहे. या विमानात ५ प्रवासी ८ क्रू मेंबर्स असे एकूण १३ प्रवासांना घेऊन विमान अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथे जाणार होते.
Indian Air Force launches Sukhoi-30 combat aircraft and C-130 Special Ops aircraft on a search mission for locating the IAF AN-32 Aircraft that last contacted ground sources at 1 PM https://t.co/AciubbR92w
— ANI (@ANI) June 3, 2019
या विमानाचा संपर्क तुटल्यानंतर भारतीय हवाई दलाकडून शोध मोहीम सुरू केली आहे. याबाबत माहिती मिळताच हवाई दलाने विमानाचा शोध घेण्यासाठी सुखोई ३० आणि सी १३० ही विमाने शोधमोहीमेसाठी रवाना केली आहेत. दरम्यान, विमान जात असलेले ठिकाण मेचुका अॅडव्हान्सड लँडिंग ग्राऊंड हे चीन सीमेच्याजवळ आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.