HW News Marathi
देश / विदेश

शबरीमाला मंदिराची अनेक वर्षे जुनी परंपरा संपविण्याचा प्रयत्न | शाह

केरळ | शबरीमाला प्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केरळमधील सरकारवर टीका केली आहे. ‘कम्युनिस्ट सरकार मंदिराविरोधात षडयंत्र रचत आहे. केरळमधील लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटकडून शबरीमाला मंदिराची अनेक वर्षे जुनी परंपरा संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असे वक्तव्य भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. ‘इतकेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्यातील महिलांचा विरोध आहे’, असेही ते म्हणाले आहेत. अमित शाह यांच्या या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.

‘भाविकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल’, असा इशारा अमित शहा यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे, शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास विरोध करणाऱ्या २,०६१ जणांना केलेल्या अटकेबद्दल अमित शहा यांनी निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान, ‘अमित शहा यांचे वक्तव्य घटनेच्या तसेच कायद्याच्या विरोधात आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आरएसएस आणि संघ परिवाराचा अजेंडा काय आहे हे समजते’, असे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरबीआयकडून नव्या २० रुपयांच्या नोटेवर महाराष्ट्रातील वेरुळच्या लेणीचे चित्र

News Desk

राजनाथ सिंह यांचा चीनला इशारा, राफेलचा समावेश हा सार्वभौमत्वावर नजर ठेवणाऱ्यांसाठी एक संदेश!

News Desk

“महाविकास आघाडीचा जन्मच….”, कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील धुसफुसीवर दावनेंचं वक्तव्य

News Desk