HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे येत्या ७ मार्चला ‘अयोध्या’ला जाणार

मुंबई। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. राऊतांनी ट्वीट करत अयोध्या दौऱ्याची माहिती दिली. यापूर्वी राऊतांनी सांगितले की, महाविकासआघाडीला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर अयोध्याला जाण्याची घोषणा केली होती. आज (२५ जानेवारी) ट्वीट करत राऊतांनी माहिती दिली.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा अयोध्याला जाणं आणि रामलल्लाचे दर्शन घेणे हे आमचे आश्वासन होते. याच आश्वासनाची पूर्तता करण्याची तयारी सुरु आहे. आता यात राजकारण आणण्याची आमची मनस्थिती नाही. हा आमचा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे”, असे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा २४ नोव्हेंबर रोजी नियोजित असलेला हा अयोध्या दौरा लांबणीवर पडला होता. आता, शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची पुन्हा घोषणा करण्यात आली आहे. अखेर उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येत जाणार असल्याची माहिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकणार असून प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांच्या गडात शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा शिवसेनेला रामराम!

News Desk

भाजपच्या नगरसेवकांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

Aprna

प्रसाद लाड यांचे पोलिसांविरुद्ध उपोषण

swarit