HW News Marathi
Uncategorized

खादी ग्रामोद्योग विशेष घटक योजनेसाठी अनुसूचित जातीतील दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यांनी अर्ज करा

उत्तम बाळे

नांदेड :- महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयामार्फत विशेष घटक योजनेखाली अनुसुचित जातीतील (एससी) दारिद्रयरेषेखालील लाभार्थ्यांचे व बचगटाचे कर्ज प्रकरणी बँकेस शिफारस करण्यात येते व मंडळाकडून २० कलमी कार्यक्रम कलम ११ + अंतर्गत अनुदान दिल्या जाते.या योजनेसाठी अनुसूचित जातीतील दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी आवयश्क कागदपत्रे पुढीलप्रमाणे फोटो दोन, ग्रामसेवक यांचे रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड / मतदान कार्ड, राशनकार्ड, तहसिलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ग्रामीण भागातील लाभार्थी करीता ४० हजार ५०० रुपये व शहरी भागाकरीता ५१ हजार ५०० रुपये, दारिद्रयरेषेचे प्रमाणपत्र, जागेचा उतारा, लाईटबील, करपावती, जातीचे प्रमाणपत्र, कोटेशन, संबंधित महामंडळाचे बेबाकी प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय नांदेड यांच्याशी दूरध्वनी – ०२४६२ – २४०६७४ वर संपर्क साधावा.तसेच तालुका बलुतेदार संस्था कर्मचारी संपर्क- सचिव, विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. (विष्णुनगर कोंडा किराणा जवळ कोंडावार यांच्या जागेत ) नांदेड, मो- ९९६०४१८४८२ , ९९२२८९६७१० , सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. लोखंडे चौक मुखेड जि. नांदेड मो. ९४०३१३५९४९,८६००८४२६०१, विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ बिल्डींग (बांधकाम विभागाच्या पाठीमागे) कंधार जि. नांदेड मो- ९४०३१३५९४९, सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. रेल्वे स्टेशन रोड भोकर जि. नांदेड- ९४२१७६१०९५, सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. अयोध्यानगर पंचायत समिती पाठीमागे अयोध्यानगर हदगाव जि. नांदेड मो- ८६२४९९४५०६,सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. गोकुंदा रोड अशोक स्तंभाजवळ किनवट जि. नांदेड मो- ८६२४९९४५०६,सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. व्यंकटेश टॉकीज जवळ देगलूर जि. नांदेड मो- ९३७३५६५५४७,७०२०६५४१४१८० , सचिव विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ म. कोंडलवाडी रोड बिलोली जि. नांदेड मो- ९३७३५६५५४७,७०२०६५४१८० यांच्याशी संपर्क साधा.

https://www.facebook.com/mahabatmi365/
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी २ सदस्यीय समितीची स्थापना

swarit

वर्षाखेरीस जहीर-सागरिकाचा शुभमंगल..

News Desk

NGMF निधी वाटपावरून काँग्रेस गोवा प्रमुखांने मुख्यमंत्री सावंतांवर लावले आरोप

News Desk