नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला. पंडित जवाहर लाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्यानंतर मोदी असा विजय मिळविणारे तिसरेच पंतप्रधान ठरले आहे. यावरून एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि नवनियुक्त खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदींवर निशाणा साधला. “या देशावर आमचा बरोबरीचा अधिकार आहे, आम्ही इथले भाडेकरू नाही, असे वक्तव्य ओवैसी यांनी केले आहे. तसेच पंतप्रधान मोदींना कुठलीच मनमानी करता येणार नाही असे देखील ओवैसी म्हणाले आहे.
Asaduddin Owaisi, AIMIM: Hindustan ko aabad rakhna hai, hum Hindustan ko aabad rakhenge. Ham yahan par barabar ke shehri hain, kirayedaar nahi hain hissedar rahenge. https://t.co/kiu7wFIx59
— ANI (@ANI) June 1, 2019
“देशाच्या पंतप्रधानांना ३०० जागा जिंकून आल्याने मनमानी करू असे वाटत असेल, तर तसे होणार नाही. देशाच्या घटनेचा आधाराने आम्ही तुम्हाला सांगू इच्छित आहोत, की ओवैसी आपल्याशी न्यायासाठी लढेल. हिंदूस्थानला सुरक्षित ठेवायचे आहे. आम्ही हिंदूस्थानला सुरक्षित राखू. आम्ही येथे बरोबरीचे वाटेकरी आहोत, भाडेकरू नाही, वाटेकरी म्हणून राहणार आहोत, ” असे ओवैसी एका सभेदरम्यान म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.