HW News Marathi
देश / विदेश

सेनेचे संपर्क प्रमुख राहिलेल्या अरविंद सावंत यांच्यावर अवजड उद्योगाची जबाबदारी

मुंबई | शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना मोदी सरकारने अवजड उद्योग पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुशिक्षित आणि संघटनकुशल अशी ओळख आहे. १९६८ साली गटप्रमुख म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.एमटीएनएलमधील कामगार संघटनेने नेतृत्व करण्याचा मोठा अनुभव असून सेनेसाठी संपर्क प्रमुख म्हणून पक्षासाठी केलेले काम या आधारावर विधान परिषदेत दोन वेळा आमदार म्हणून काम करण्याची संधी देखील सावंत यांना मिळाली.

शिवसेनेचे उपनेतेपदही त्यांनी भूषविले. मराठीसोबतच हिंदी, इंग्लिश भाषेची त्य़ांना चांगली जाण आहे. त्यामुळे विधानपरिषदेत ते अभ्यासू भाषणे करत. २०१४ मध्ये त्यांनी पहील्यांदाच लोकसभेची निवडणूकी लढवीली आणि १,२८,००० च्या मताधिक्याने अरविंद सावंत निवडणुकीतील जायन्ट किलर म्हणून विजयी झाले! तर आता मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रीपदाची शपथ घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ

swarit

हवामान बदलामुळे पहिल्याच दिवशी अमरनाथ यात्रेला ब्रेक

News Desk

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द ! मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाला वर्ष पूर्ण

News Desk