HW News Marathi
देश / विदेश

ऑस्ट्रेलियाचे भारतीय उच्चायुक्त barry o’farrell Ao कडून मुख्यमंत्र्यांना मराठीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आज (२७ जुलै) वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, राज्यातील एकूण वातावरण पाहता मुख्यमंत्र्यांनी माझा वाढदिवस साजरा करु नका असं सांगितलं होतं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना ऑस्ट्रेलियाचे भारतीय उच्चायुक्त barry o’farrell Ao यांनी चक्क मराठीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळच्या सुमारास ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करतो,” असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला दिर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो,” असं अजिंक्यनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीबीआय संचालकांना रातोरात का हटवले? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

News Desk

मराठमोळे शरद बोबडे देशाचे नवे ४७ वे सरन्यायाधीश

News Desk

#PulwamaAttack : गृहमंत्री राजनाथ सिंह श्रीनगरकडे रवाना

News Desk