HW News Marathi
देश / विदेश

खड्ड्यामुळे दरदिवशी सहा जणांचा बळी

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारतात २०१६ मध्ये २४२४ जणांचे खड्ड्यापायी बळी गेले आहेत. दिवसाला किमान सहा जणांचा मृत्यू खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अकडा अमेरिकेत गतवर्षी झालेल्या सर्व अपघातांमधील मृतांच्या आकड्यांपेक्षा जास्त आहे. अपघातांच्या या यादीत उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून खड्ड्यांमुळे वर्षभरात ७१४ जणांचा मृत्यू झाला असून, यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात खड्ड्यांमुळे ३२९ जणांनी जीव गमावला आहे.

विशेष म्हणजे सर्वात जास्त वाहनसंख्या असणाºया दिल्लीत खड्ड्यांमुळे एकही अपघात झाला नसल्याची नोंद आहे. सरकारने दिलेल्या आकडेवारीवरून, पोलीस कशाप्रकारे अपघाताच्या खºया कारणाचा शोध न घेता, तपास दुसºया दिशेला वळवतात हे स्पष्ट झाले आहे. प्रवाशांकडून वारंवार रस्त्यांवरील खड्डयांची तक्रार केली जात असतानाही गतवर्षी वाहतूक मंत्रालयाने अपघाताची आकडेवारी जाहीर करताना खड्डयांमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा केला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही आकडेवारी जाहीर करण्यात आली होती.

गाडी चालवताना मोबाइलवर बोलण्याची हौस जिवावर, फक्ता एका वर्षात २१०० जणांचा मृत्यू

वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार गतवर्षी गाडी चालवत असताना मोबाइलचा वापर केल्याने जवळपास २१३८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, रस्ते दुर्घटनांमध्ये होणाºया सर्वात जास्त मृत्यूमागचं मुख्य कारण मोबाइलचा वापर आहे. वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडणाºयांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर हरियाणाचा क्रमांक आहे. राजधानी दिल्लीत गतवर्षी दोन जणांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील आकडा मोठा आहे. महाराष्ट्रात एकूण १७२ जणांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. पहिल्यांदाच वाहतूक मंत्रालयाने राज्यांकडून ही माहिती गोळा केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

102 व्या घटनादुरुस्तीत बदल करणारे विधेयक आज लोकसभेत मांडलं!

News Desk

ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल

News Desk

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले

News Desk