HW News Marathi
क्राइम

वाहतूक पोलिसाला मारहाण

ठाणे शुक्रवारी सकाळी गाडी उचलण्याच्या करणावरून एका तरूणांने वाहतूक पोलिस कर्मचा-याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आहे. ही घटना दम्मानी इस्टेटमधील गोल्ड जिमसमोर घडली आहे. याप्रकरणी पवन पजवानी या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणाची दुचाकी टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी उचलली. पवणच्या हे लक्षात आले. त्याने त्याची दुचाकी व्हॅनवरुन खाली खेचण्यास सुरुवात केली. दंड घ्या आणि आताच्या आता पावती द्या असे म्हणत त्याने दोन हजारांची नोट पुढे केली. ‘बाजूलाच ट्रॅफिक ऑफिस आहे, तिथे पैसे भरुन गाडी घेऊन जा’, असे हवालदार मोरे यांनी तरुणाला सांगितले. परंतु संतापलेल्या पवनने हवालदार काशिनाथ मोरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

हवालदार काशिनाथ मोरे यांच्या तक्रारीवरुन नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये सरकारी कामकाजात अडथळा आणणे तसेच सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी पवन पजवानी विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोलकरांवर गोळीबार केला !

News Desk

माथेरानमध्ये पोलिसांकडूनच वाहन बंदीचे उल्लंघन, स्थानिकांकडून कारवाईची मागणी

News Desk

बच्चू कडू यांना न्यायालयाचा दणका; ‘या’ प्रकरणी शिक्षा आणि जामीन

Aprna