HW News Marathi
देश / विदेश

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ‘या’ नेत्याची होणार नियुक्ती

नवी दिल्ली | भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, भाजपमध्ये सर्वसहमतीनं राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची परंपरा आहे. याच सहमतीने कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे.पी.नड्डा यांची वर्णी लागणार आहे. केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात जूनमध्येच पत्र लिहिलं होतं. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात यावी, अशी विनंतीही या पत्रातून केली होती.

अमित शहा यांची मोदी सरकारमध्ये गृहमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाला नियपक्त करायचे हा प्रश्न होताच पण आता तो प्रश्न जवळपास सुटल्यातच जमा आहे. या निवडणुकीची खासियत म्हणजे या पदासाठी नड्डा यांची बिनविरोध निवड होणार असल्याचं वृत्त असून, त्यामुळे आजच नावाची घोषणा होण्याचीही शक्यता आहे.

कोण आहेत जे.पी.नड्डा?

विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेले जे.पी.नड्डा हे आरएसएसच्या जवळचे मानले जातात. मूळचे हिमाचल प्रदेशातील असलेल्या नड्डा यांच्याकडे संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असून स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर उत्तर प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने सपा आणि बसपाच्या आघाडीच्या आव्हाहनाला परतवून लावत ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०१९च्या जुलै महिन्यात नड्डा यांना भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नड्डा हे मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते. भाजपचे महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या संसदीय बोर्डात ते सदस्य देखील होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट हॅक, बिटकॉईनची केली मागणी

News Desk

देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवर मोदींनी विद्यार्थ्यांसमोर भाष्य करावे, राहुल गांधींचे आव्हान

News Desk

ओडिसामध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

News Desk