HW News Marathi
राजकारण

शिवसेनेच्या लिलाधर डाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी होणार नियुक्ती

मुंबई | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या अभूतपूर्व विजयानंतर आज (३० मे) आपल्या नव्या मंत्रिमंडळासह नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती भवनात ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडेल. या पार्श्वभूमीवर, मोदींच्या या मंत्रिमंडळाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. दरम्यान, शिवसेनेला मंत्रीपदासोबतच राज्यपालपदही दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.

एनडीए सरकारने लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. राष्ट्रपती भवनात आज (३० मे) संध्याकाळी ७ वाजता आपल्या नव्या मंत्रिमंडळासह नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. दरम्यान, मोदींच्या या मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेकडून आज दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत हे केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सत्तांतरावरील आजची सुनावणी संपली; उद्या होणार पुढील युक्तीवाद

Aprna

पीक विमा योजनेमध्ये मोठा घोटाळा !

News Desk

रिपब्लिकन पक्षाला मिळणारे राज्यातील एक मंत्रिपद दीड वर्षात तीन कार्यकर्त्यांना वाटून देणार | आठवले

News Desk