HW News Marathi
महाराष्ट्र

 मेगाभरतीवरून चंद्रकांत पाटलांचा  यू-टर्न

मुंबई । मेगाभरतीमुळं भाजपची संस्कृती बिघडली आहे. मेगा भरती ही मेगा चूक होती, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल केले होते. या वक्तव्यावर पाटलांनी यू-टर्न घेतला आहे. लोकसभा आणि विधानसभेपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेल्या नेत्यांमुळं भाजपला फायदाच झाला, भाजपामध्ये आलेल्या लोकांचा आम्हाला अभिमान आहे. असं स्पष्टीकरण आज चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. पिंपरीतल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मेगाभरतीसंदर्भात खंत व्यक्त करणारे सूर आळवले होते. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांनी पक्षाला घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र आज मुंबईत पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मी जे काही बोललो त्याचा विपर्यास केला गेल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. “भाजपामध्ये आलेल्या लोकांचा आम्हाला फायदाच झाला आहे. भाजपा कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आमची पार्टी कोणाचीही मालकी होऊ शकत नाही. ती कार्यकर्त्यांच्या मालकीची आहे. कालच्या आकुर्डीतील माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. माध्यमांनी बातमी दाखविण्याअगोदर पडताळणी करावी. जुन्यांना डावलले असे नाही, २७ तिकीटं नव्या लोकांना दिली. भाजपामध्ये मेगा भरतीचा निर्णय कोअर कमिटीचा होता. माझ्या एकट्याचा नव्हता.”

मेगाभरतीत या नेत्यांनी केला होता भाजप प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस- राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. फडणवीस मुख्यमंत्री असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे पाटील, साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील बडे नेते, माजी मंत्री गणेश नाईक, मुंबईतील काँग्रेस नेते, माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह इंदापूरचे काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, साताऱ्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह, राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मधुकरराव पिचड, त्यांचे पुत्र विद्यमान आमदार वैभव पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ, काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ड्रग्जप्रकरणातील माझा फोटो व्हायरल करणाऱ्याला लाज, लज्जा, शरम आहे की नाही?

News Desk

अॅड. गुणरत्न सदावर्तेंची जामीनावर सुटका; तब्बल 18 दिवसांनी तुरुंगातून बाहेर

Aprna

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन

News Desk