HW News Marathi
राजकारण

मीच नव्हे तर माझ्यासोबत काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील

नवी दिल्ली | “मी एकटाच नाही तर माझ्यासोबत काँग्रेसचे ७ आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील”, अशी माहिती काँग्रेसकडून निलंबित करण्यात आलेले बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्व राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी देखील आपल्या भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

“काँग्रेस आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यातील काहीजण मंत्रीपदाची शपथ देखील घेतील”, अशी माहितीही अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. सत्तार यांना औरंगाबादमधून उमेदवारी हवी होती. मात्र, काँग्रेसकडून सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली. यावरून सत्तार यांनी पक्षाविरुद्ध बंड पुकारला होता. अब्दुल सत्तार यांनी जालना मतदारसंघाचे भाजप उमेदवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आणि औरंगाबादचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एमपी मिल कंपाऊंड घोटाळा प्रकरण | मनाची लाज ठेऊन मेहतांनी राजीनामा द्यावा !

News Desk

दुष्काळ उपाययोजनांसाठी केंद्राकडे ७ हजार कोटीची मागणी

News Desk

माझ्या जीवाला धोका, पोलीस संरक्षण द्यावे !

News Desk