मुंबई | “आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलो तरी आम्ही त्यांच्या आडणानावाचा दुरुपयोग केला नाही. आणि तुम्ही शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का? शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा”, असं वादग्रस्त विधान करणाऱ्या उदयनराजे भोसले यांना संजय राऊतींनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा आणा”, असं आवाहन राऊतांनी उदयनराजे यांना केले आहे. या आवाहानामुळे आता पुन्हा वादाला एक विषय मिळाला असंच म्हणावं लागेल.
पुण्यात एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सामनाचे संपादक संजय राऊत यांनी उदयनराजेंसोबत वादासाठी हातमिळवणी केली आहे. पण संजय राऊतांना या वादग्रस्त विधानामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून इशारा देण्यात आला आहे. तुम्ही राजकारणात कोणाचे नाव घेताय ते आधी विचार करुन घ्या, छत्रपतींच्या घराण्याबद्दल काही बोललात तर आम्ही सहन करणार नाही अशा स्पष्ट शब्दात इशारा दिला. इतकेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागी आम्ही उदयनराजेंना मानतो असंही त्यांनी म्हटले. आणि तुम्ही हे वक्तव्य वादग्रस्त पुस्तक लिहिणाऱ्या गोयल यांच्याविषयी न बोलता थेट छत्रपतींच्या घराण्याबद्दल बोलला आहात आण पुराव्यांचंच म्हणालंतर ते हवे असल्यास तुम्ही साताऱ्याला या असे खडे बोल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आबा पाटील यांनी संजय राऊत यांना सुनावले.
तुम्ही तुमच्या शिवसेनेच्या नेत्यांना आवरा.आम्ही तुमचा सन्मान करतो पण शिवसेनेचा एखादा नेता छत्रपतींच्या घराण्याबद्दल बोलत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका आणि संजय राऊत यांना जाहीर माफी मागायला लावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.