HW News Marathi
क्राइम

दीड किलोची गणेश मूर्ती चोरणा-या आरोपीसह सोनाराला कारावास    

मुंबई: दिवे आगारमधील सुवर्ण गणपती चोरी प्रकरण पाच आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर दोन सोनारांना दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपींमध्ये कैलास विक्रम भोसले व सतीश ऊर्फ पिंट्या गेणू काळे आणि मूर्ती वितळविण्यास मदत करणारी महिला यांचा समावेश आहे.

कोकणात २४ मार्च २०१२ ला ही घटना घडली होती. यात महादेव गोपाळ घडशी आणि अनंता बापू भगत या दोघांचा मृत्यू झाला होता. तर सुवर्ण गणेशाची प्राचिन मूर्ती दरोडेखोरांनी जवळपास दीड किलो सोन्याची गणेश मूर्ती दरोडेखोरांनी लुटून नेली होती. या प्रकरणी दिघी सागरी पोलीस स्टेशन मध्ये १२ विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात याची सुनावणी सुरू होती. मंदिरातील सिसीटिव्ही कॅमेºयात कैद झालेल्या आरोपींचे शुटींग, त्यांनी वापरलेल्या मोबाईल सिमकार्डचे टॉवर लोकशन यामुळे गुन्ह्याच्या घटनांची मांडणी करण्यात पोलीसांना यश आलेआहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मनीष भंगाळेला पोलिस कोठडी,

News Desk

अडीच वर्षाच्या चिमुकलीच्या हत्येप्रकरणी अलीगड पोलिसांनी ४ जणांना केली अटक

News Desk

​पोलिसाच्या चाकुहल्यात सात जण जखमी

News Desk
मुंबई

मोदीविरोधात लिखाण करणे महागात, पोलीस निलंबित

News Desk

मुंबई: देशात लोकशाही अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडावा, असे काहीसे उदाहरण घडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर लिखाण केले म्हणून एका पोलीसाला निलंबित करण्यात आले आहे. रमेश शिंदे असे या पोलिसाचे नाव असून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील आहे. या कारवाईचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबवण्याचा प्रयत्न या सरकारकडून सुरू असल्याचे हे आणखी एक उदाहरण म्हणावे लागले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर लिखाण केल्याच्या कारणावरून जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी शनिवारी निलंबनाची कारवाई केली. शिंदे हे अनेक वर्षांपासून माजी मंत्री थोरात यांचे अंगरक्षक म्हणून काम करत आहेत. शिंदे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरुन मोदींविरोधातील लिखाणाचा मजकूर अनेक ग्रूपवर पाठवल्याच्या तक्रारीनंतर सायबर विभागाने याप्रकरणाची चौकशी केली. मोदीविरोधातील मेसेज शिंदे यांच्या मोबाईलवरुन व्हायरल झाल्याचं आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Related posts

पुणे रेल्वे टीसीने केली प्रवाश्याला मारहान

News Desk

बंदमुळे जो भडका उडाला, सुप्रीम कोर्ट आणि शासन जबाबदार

News Desk

लोकायुक्तांकडे दररोज दाखल होतात 15 तक्रारी

News Desk