HW News Marathi
मुंबई

उंदरासाठी १३० कोटीचं घर 

मुंबई – उंदरांसाठी तब्बल १३० कोटी रूपये खर्च करून घर बांधण्यात आलंय़…. विश्वास वाटत नाही ना….पण हो हे घरं आहे. असं म्हणणं आहे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ याचं…त्यांनी महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढत पालिका प्रशासनाला धारेवर धरलं आहे. मुंबईतील प्रसिद्ध शताब्दी हॉस्पिटल सध्या उंदरांच घर झाल्याची टिका त्यांनी केली आहे.

या हॉस्पिटलच्या नुतनिकरणासाठी पालिकेनं तब्बल १३० कोटींचा खर्च केला आहे. मात्र या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही सोई सुविधा नाहीत. दिवस रात्र या हॉस्पिटलमध्ये उंदरांचा खुलेआम संचार सुरू असतो असा आरोपही त्यानी केला आहे. त्याचा फटका मात्र रूग्णांना बसत आहे. त्यामुळे १३० कोटी रूपये खर्च करून नुतनिकरण केलेलं हे हॉस्पिटल उंदरांच घर झाल्याची टिका त्यांनी केलीय. या हॉस्पिटलमध्ये नुकतेच एका महिलेच्या पाण्यांचा चावा उंदराने घेतला तर दुसऱ्या महिलेच्या पायाला उंदर चावला. त्यानंतर ही बाब लक्षात आली. चित्रा वाघ यांनी तातडीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह शताब्दी रूग्णालयातवर धडक मारली. तीथं त्यांना ही गंभिर स्थिती दिसून आली. त्यानंतर याचा निषेध करण्यासाठी पालिका आयुक्तांना उंदराचे पिंजरे भेट देण्यात आले. शिवाय रूग्णालयात अजूनही जवळपास दिडशेच्या आसपास उंदराची बिळ आढळून आल्याची माहिती त्यांनी आयुक्तांना दिली. या प्रश्नाकडे पालिकेनं गंभिरतेनं पहावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपकडून जाहिरातबाजीवर 500 कोटींचा खर्च – नवाब मलिक

News Desk

शिवसेनेचा कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा

News Desk

डी के रावच्या पोलिस कोटडीत वाढ

News Desk